Home अहमदनगर अहमदनगर: गॅस टाकीचा स्फोट होऊन भीषण आग

अहमदनगर: गॅस टाकीचा स्फोट होऊन भीषण आग

Breaking News | Ahmednagar: पत्र्याच्या शेडमध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन दोन जण जखमी.

A gas tank exploded and caused a huge fire

कर्जत : कर्जत शहरालगत बर्गेवाडी शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले. ही घटना सोमवार (दि.१) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. या स्फोटात एक दुचाकी जळाली असून, घराच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे घटनास्थळाला लागूनच अवघ्या दोन फूट अंतरावर भारत गॅस टाक्याचे गोडावून आहे. बाहेरील परिसरात शेकडो गॅस टाक्या उघड्या पडल्या होत्या. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास बर्गेवाडी (ता. कर्जत) येथे सचिन उत्तम लोंढे आणि वैभव निकत हे दोघे हयगयीने गॅस टाकी हाताळत असताना स्फोट होऊन आग लागली. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, कर्जत शहर आणि बर्गेवाडी परिसरात हादरे बसले. आगीचे लोळ उंच उडत होते. लगतच भारत गॅस कंपनीचे गॅस टाक्याचे गोडावून आणि त्यांचा शेकडो टाक्यांचा परिसरातील साठा याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. कोणीच पुढे जाण्यास तयार होत नव्हते. कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत एकूण १२ पूर्ण जळालेल्या गॅसटाक्या, ४ इलेक्ट्रिक मोटार, स्टोव्ह, भांडी व साहित्य, गहू, स्कूटी खाक झाले.

सचिन लोंढे व वैभव निकत यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन होणाऱ्या जीवित व वित्तहानीस आपण जबाबदार होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना असतानाही सदरचे कृत्य करीत होते. अशा आशयाची फिर्याद पोलिस कर्मचारी अमित बर्डे यांनी दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A gas tank exploded and caused a huge fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here