Home महाराष्ट्र ट्रॉलीला ट्रकची धडक; बालिकेसह चौघांचा मृत्यू

ट्रॉलीला ट्रकची धडक; बालिकेसह चौघांचा मृत्यू

Breaking News | Sangli Accident:  वाहन गेले तब्बल ७० फूट फरफटत, भीषण अपघातात बालिकेसह चौघांचा मृत्यू.

Accident Truck hits trolley Four died, including a girl

सांगली: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याकडेला थांबलेल्या ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीस भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन वर्षांच्या बालिकेसह चार मजूर ठार, तर दहा जण जखमी झाले. मंगळवारी मध्यरात्री तीन वाजता आगळगाव फाट्यावर हा अपघात घडला.

 सर्व मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी शिरनांदगी येथील आहेत. शालन दत्तात्रय खांडेकर (वय ३०, रा. शिरनांदगी), लगमा तम्मा हेगडे (३५), दादा आप्पा ऐवळे (१७), नीलाबाई परशुराम ऐवळे (३ वर्षे, सर्व रा. चिक्कलगी, ता. मंगळवेढा), अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून, मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेहांवर मूळ गावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Accident Truck hits trolley Four died, including a girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here