शाळकरी मुलीने दिला मुलीला जन्म, संशयितांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
Breaking News | Nashik Crime: अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत संशयिताने बलात्कार (Raped) केल्याची घटना उघडकीस.
नाशिक: अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे गर्भवती झालेल्या मुलीने नवजात बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी २० वर्षीय संशयितांविरुद्ध पोस्कोन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित गणपत कडाळे (२०, रा. शिवाजीवाडी, वडाळा-पाथर्डी रोड) असे संशयिताचे नाव आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी की, त्यांची मुलगी ही रविवार कारंजा परिसरात शाळेत शिक्षण घेते. तर संशयित रोहित याच्याशी २०२३ मध्ये ओळख झाली. त्यानंतर संशयिताने तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिला फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याच्या दुचाकीवरून पांडव लेणी परिसरातील तितली गार्डनमध्ये नेले आणि त्या ठिकाणी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. अशाप्रकारे त्याने वारंवार अत्याचार केला. या प्रकारातून मुलगी गर्भवती राहिली आणि तिने नवजात स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा प्रकार इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्हा इंदिरानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
Web Title: suspect took advantage of the ignorance of a minor girl and raped her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study