Home अहमदनगर अश्लील फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

अश्लील फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

Ahmednagar News Torture a young woman threatening to make a pornographic photo

अहमदनगर | Ahmednagar News: अश्लील फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत श्रीरामपूर येथील तरुणीवर नगरमधील तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

नगर शहरातील सावेडी उपनगरात बुधवारी सायंकाळी एका हॉटेलवर ही घटना घडली आहे. याबाबत पिडीत तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून अमित प्रकाश चांदणे रा. जय भवानी चौक वडगाव गुप्ता ता. नगर याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरूणी मुळची श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून सध्या नगर शहरात राहते. बुधवारी सायंकाळी अमित चांदणे याने त्या तरूणीला फ्लॅट दाखविण्याचा व वकीलास भेटण्याचा बहाण्याने दुचाकीवरून सावडी उपनगरातील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तरूणीला कोल्ड्रिंक्स पाजून तिच्या इच्छेविरूद्ध बळजबरीने अंगलटपणा केला.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

तरूणीने अमितला विरोध केला असता त्याने तिचे अश्‍लिल फोटो काढले. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत, तरूणीवर अत्याचार केला. सदर प्रकार बाहेर कोणाला सांगितल्यास तुला जीवे ठार मारून टाकेन,  अशी धमकी अमितने पिडीत तरूणीला दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Torture a young woman threatening to make a pornographic photo viral on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here