Home अहमदनगर अल्पवयीन मुलीसमोर चाळे करणाऱ्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीसमोर चाळे करणाऱ्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime News Accused of molesting a minor girl

अहमदनगर | Crime News: क्लासवरून घरी जात असणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर चाळे करणाऱ्या तरुणावर तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावेडी उपनगरात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मिनीनाथ दिलीप चव्हाण (वय 24 रा. भिस्तबाग चौक, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अल्पवयीन मुलगी तिच्या लहान भावासह सायकलवरून घरी जात असताना मिनीनाथ चव्हाण याने त्यांना पाहिले. मुलगी व तिचा भाऊ त्यांच्या घराजवळ पोहचले असता मिनीनाथ त्याच्या दुचाकीवरून तेथे आला.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

मुलीजवळ कोणी नसल्याचा गैरफायदा घेत मिनीनाथ याने तिच्याशी गैरवर्तन करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी भेट दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहे.

Web Title: Crime News Accused of molesting a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here