अकोले तालुक्यात एकाच रात्रीत १२ ठिकाणी घरफोड्या
अकोले | Akole: तालुक्यात प्रवरा परिसरामध्ये काल पाच गावांमध्ये दहा ते बारा घरे फोडून मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास करण्यात चोरट्यांना यश आले असून पोलीस यंत्रणेचे पेट्रोलियम सुरू असताना देखील या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून तालुक्यातील प्रवरा परिसरातील चितळवेढे गावातील उद्योजक व उत्कृष्ट शेतकरी ज्ञानेश्वर किसन आरोटे यांच्या घरातील दरवाजाचे कुलपे तोडून सुमारे पन्नास तोळे सोने व सहा लाख रुपयांची कॅश चोरांनी पळवून नेण्यात यश मिळवले आहे
तर दुसरीकडे मात्र याच परिसरातील विठे, शेरणखेल, मेहेंदुरी, इंदोरी, रुभोडी या गावात देखील यात रात्री चोरट्यांनी काही तासातच लाखो रुपयांचा माल गायब करण्यात आले मात्र दुसरीकडे ज्या घरांमध्ये कोणीही नसल्याचा सुगावा घेईल त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात चोरी झाली असल्याचे चित्र समोर आले. पोलीस यंत्रणेने या चोरांना चार दिवसात आम्ही अटक करू असे नागरिकांना सांगितले असले तरी नागरिक मात्र आपल्या घरातील जेवढ्या मालाची चोरी झाली तेवढा मालाची नोंद करण्यास देखील पोलिस यंत्रणा तयार नव्हती त्यामुळे काही तासंतास पोलीस यंत्रणेकडे संबंधित नागरिकांनी लावून देखील त्यांनी त्याकडे कानाडोळा केला आता तरी या चोरांना पकडण्यात पोलिस यंत्रणेला यश येणार का अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज सकाळी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ज्ञानेश्वर आरोटे यांच्या घरी भेट देऊन संगमनेर उपविभगिय अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क करून घटनेची माहिती दिली व तपास यंत्रणा सतर्क करण्यास सांगितले एकूण १३ लाख ५० हजार रुपयाचा ऐवज गेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
Web Title: Burglary in 10 to 12 places in Akole taluka in one night