Home संगमनेर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खाते लॉकनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खातेही लॉक

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खाते लॉकनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खातेही लॉक

Balasaheb Thorat Tweeter Account Lock

संगमनेर: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर खाते लॉक करण्यात आल्याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक या खात्यावर प्रसारित केली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, आज @TwitterIndia ने माझे ट्विटर हॅण्डल लॉक केले. कारण काय तर म्हणे राहुल गांधीजी यांना समर्थन करणारे ट्विट केले म्हणून! मुळात राहुल गांधी हे लढवय्ये नेते आहेत. निडर होऊन ते सामान्य जनतेच्या सोबत उभे राहतात, त्यांचा आवाज बनतात. राहुलजी यांचा आवाज दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

खरेतर ट्विटर हे समाजमाध्यम आहे, तेथे आपण आपले मत मांडू शकतो. लोकशाहीमध्ये हा मत मांडण्याचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे. आमचे नेते राहुलजी आणि आम्ही काँग्रेसजन ट्विटरच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत होतो.

ट्विटर ने काही दिवसांपूर्वी राहुलजी गांधी यांचे अकाऊंट लॉक केले आणि आज काँग्रेस पक्षाच्या अधिकृत @INCIndia या हॅण्डल सह अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची हॅण्डल लॉक केले. आम्ही देशविघातक, धार्मिक द्वेष वाढविणारे किंवा जातीय तेढ निर्माण करणारी मते मांडलेली नाही. एका पिडीत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हा काय गुन्हा आहे का?

ट्विटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले समाजमाध्यम आहे. सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्विटर ने आपल्या भूमिका ठरवू नये.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्याची ही मुस्कटदाबी आहे, आम्ही याचा निषेध करतो.

आम्ही लोकशाहीच्या हितासाठी आवाज उठवत राहू, लढू आणि संघर्ष करू.

जय हिंद!

बाळासाहेब थोरात

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

Web Title: Balasaheb Thorat Tweeter Account Lock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here