Home क्राईम संगमनेर: कार मधुन गांजाची वाहतूक, १८ हजार रुपयांचा गांजा जप्त

संगमनेर: कार मधुन गांजाची वाहतूक, १८ हजार रुपयांचा गांजा जप्त

Sangamner Crime:  कार मधुन गांजाची वाहतूक करताना आढळल्याने पोलिसांनी या वाहनाला पकडून पोलिसांनी वाहन चालकाकडून १८ हजार रुपयांचा गांजा जप्त  (seized) केल्याची घटना.

Transportation of ganja from car, ganja worth Rs. 18 thousand seized

संगमनेर: गांजा विक्रीला बंदी असताना कार मधुन गांजाची वाहतूक करताना आढळल्याने पोलिसांनी या वाहनाला पकडून पोलिसांनी वाहन चालकाकडून १८ हजार रुपयांचा गांजा जप्त केल्याची घटना काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरात लगतच्या कोल्हेवाडी रोड परिसरात घडली.

राज्यात गांजा विक्री व उत्पादनाला बंदी आहे असे असतानाही संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री केली जात आहे. कोल्हेवाडी रस्त्यावरून टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या नेक्सॉन कार मध्ये (क्रमांक एम.ए 12 क्यु. एम. 4985 ) गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली.

पोलिसांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी असणाऱ्या चर्च जवळ पोलिसांनी या कारला अडवले. या कारची झडती घेतली असता या कारमध्ये १८ हजार रुपये किमतीचा २ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा आढळला.

काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेले कॅनाबीस या वनस्पतीचे शेंडे उग्रवास येत असलेला गांजा खाकी रंगाचे प्लॅस्टीकचे सेलोटेप मध्ये हा गांजा गुंडाळलेला होता. पोलिसांनी गांजा सह कार जप्त केली.

याबाबत पोलिसांनी संदिप विष्णु पालांडे, वय 39 वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहे.

Web Title: Transportation of ganja from car, ganja worth Rs. 18 thousand seized

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here