संगमनेरात १५० जणांवर गुन्हा दाखला. सहा जणांना अटक, जाळपोळ, तलवारीचा वापर करीत मारहाण
Sangamner Crime | Six Arrested: हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून शहरातील जोर्वे नाका परिसरात जोर्वे येथील युवकांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी सुमारे 150 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा.
संगमनेर: हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून शहरातील जोर्वे नाका परिसरात जोर्वे येथील युवकांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी सुमारे 150 जणांविरुद्ध सोमवारी पहाटे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रात्री उशीरा या घटनेतील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य पसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
जोर्वे येथील सुमित पोपट थोरात, तन्मय राजेश दिघे, पुंडलिक पोपट दिघे, विजय मंजाबापू थोरात हे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पिकअप गाडीने जात असताना शहरातील जोर्वे नाका परिसरात गाडीचा हॉर्न वाजविण्याचा कारणावरून या ठिकाणी उभे असलेल्या काही युवकांनी त्यांना मारहाण केली होती. मारहाण झाल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर ते आपल्या जोर्वे या गावी जात असताना जोर्वे नाका परिसरात त्यांना एका समाजाच्या युवकांनी मारहाण केली.
हातात तलवार, चॉपर, फायटर, लाकडी दांडे, लोखंडी रॉड घेऊन ‘ये वही लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देणे गये थे, आज इन्हें जिंदा घर नहीं जाने देंगे’ असे बोलून त्यांनी या युवकांवर धारदार शस्त्राने वार केले. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून फिर्यादीच्या डोक्यात पाठीवर लोखंडी रॉड मारून तसेच धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण करून इतर युवकांनाही दांड्याने व फायटरने व लाकडी रॉडने मारुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीत सुमित पोपट थोरात (वय 20), तन्मय राजेश दिघे (वय 18), पुंडलिक पोपट दिघे (वय 17), विजय मंजाबापू थोरात (वय 45), अजय भिमाजी थोरात (वय 45), जितेंद्र कैलास दिघे (वय 29), रविंद्र नामदेव गाडेकर (वय 31), बाबासाहेब शिवाजी थोरात (वय 35) सर्व राहणार जोर्वे हे आठ जण जखमी झाले आहेत.
जोर्वे येथील युवकांना मारहाण झाल्याची माहिती समजताच रात्री उशिरा जोर्वे येथील शेकडो ग्रामस्थ शहर पोलीस ठाण्यात आले होते. एका समाजाच्या युवकांनी मारहाण केल्याने संतप्त झालेले हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही पोलीस ठाण्यात जमा झाले. आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
या मारहाणीत जखमी झालेल्या रविंद्र नामदेव गाडेकर याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून रात्री उशिरा पोलिसांनी बाबू टपरीवाला, इम्रान वडेवाला, नदीम हुसेन शेख, इम्रान (युसूफ पेंटरचा मुलगा, रियाज जहीर शेख, रिक्षावाला, साफीक चहावाला, साफीक, इरफान, अकील टपरीवाला (पूर्ण नाव माहीत नाही), ताहीर नजिर पठाण, शाहीद वाळूवाला, फय्युम, खान वडेवाला, आरफत, रफिक शेख, इरफान वडेवाला याचेकडे काम करणारे तीन जण (पूर्ण पत्ता माहीत नाही) या 18 जणांसह इतर शंभर ते दीडशे जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 418/2023 भारतीय दंड संहिता कलम 307, 324, 143, 147, 148, 149, आर्म अॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निवांत जाधव करत आहेत.
किरकोळ कारणावरून तालुक्यातील जोर्वे येथील युवकांना संगमनेर शहरात मारहाण झाल्याने याची संतप्त प्रतिक्रिया सोमवारी सकाळी जोर्वे गावात उमटली. संतप्त झालेल्या जमावाने एका धर्मगुरुची मोटारसायकल पेटवून दिली. या गावात असलेल्या मटन विक्रीच्या दुकानांच्या फलकांची नासधूस करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App