Home अहमदनगर अभ्यास करीत असताना झालेल्या वादातून प्रेयसीने केला प्रियकराचा खून, तरुणी नगरची

अभ्यास करीत असताना झालेल्या वादातून प्रेयसीने केला प्रियकराचा खून, तरुणी नगरची

Pune Crime: परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेलेल्या तरुणीने प्रियकराचा चाकूने वार करत खून (Murder) केल्याची घटना.

Girlfriend Murder boyfriend, girl from Ahmednagar

पुणे: परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेलेल्या तरुणीने प्रियकराचा चाकूने वार करत खून केला. यावेळी झालेल्या झटापटीत प्रेयसीही जखमी झाली. ही घटना वाघोली येथे घडली. प्रेयसीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यशवंत मुंडे (22, रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकांक्षा पन्हाळे (21, रा. अहमदनगर) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत मुंडे आणि आकांक्षा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजमध्ये डाटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या महाविद्यालयाची परीक्षा असल्याने ते दोघे एकत्रित अभ्यास करत होते. रविवारी रात्री आकांक्षा पन्हाळे ही यशवंत मुंडे याच्या रायसोनी कॉलेज जवळील खोलीवर अभ्यास करण्यासाठी आली होती.

सोमवारी पहाटे दोघांमध्य काहीतरी कारणावरून वाद झाले. यावेळी आकांक्षा हीने स्वयंपाक घरात जाऊन भाजी कापण्याचा चाकू हातात घेत यशवंत याच्यावर चाकूने वार केले. दोघांमध्ये सुरू असलेल्या झटापटीत गंभीर जखमी झालेल्या यशवंत मुंडे याचा मृत्यू झाला आहे. तर . आकांक्षा ही सुद्धा जखमी झाली असून तिला उपचार करीता वाघोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच, लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत यशवंत मुंडे याचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

आकांक्षाने रागाच्या भरात यशवंत याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केले. पोटावर वर्मी वार लागल्याने यशवंत जागीच मृत झाला. यानंतर जखमी आकांक्षा एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली. तेथे तीने डॉक्टरांना हकीकत सांगितले. यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची खबर दिली. सध्या आकांक्षावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.” – गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Web Title: Girlfriend Murder boyfriend, girl from Ahmednagar

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here