Home Accident News Accident:  ट्रालाची चारचाकीला भीषण अपघात; तीन ठार, दोन जखमी

Accident:  ट्रालाची चारचाकीला भीषण अपघात; तीन ठार, दोन जखमी

Trawler's four-wheeler Accident Three killed

नंदूरबार | Nandurbar:  नंदूरबारहून धमडाई येथे जाणाऱ्या गाडीला तळोदा रस्त्यावरील हॉटेल हायवेसमोर चारचाकीला भरधाव वेगाने येणारा  ट्रालाने समोरून धडक दिल्याने अपघात (Accident) घडला. या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.

योगेश उर्फ अमृत नारायण सोनवणे व मयत तिघे मारुती इर्टिगा (Maruti Irtiga) कंपनीची चारचाकी (क्र.जीजे-15-सीजी-0723) ने नंदुरबार कडुन धमडाई कडे २५ मार्च रोजी रात्री एक वाजता जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणारा ट्राला (क्र.जी-18,ए.जे-1763) वरील अज्ञात चालकाने समोरून धडक दिली.

रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून राँग साईडने येवून ट्राला मध्ये ठेवलेल्या बाहेर निघालेल्या मशिनच्या पत्र्याने इर्टिगा गाडीस ड्रायव्हर साईडला जोरात धडक मारुन अपघात झाला.

या अपघातात इर्टिका गाडीमधील प्रशांत रमणभाई सोनवणे ( वय 40) व, रा.वलसाड (गुजरात) (Gujarat), अनिल रामदास सोलंकी (वय -35 वर्षे) रा.हाटमोहिदा ता.जि नंदुरबार ह.मु. उधना (गुजरात), हिरालाल सुभाष पवार (वय 35 वर्षे) रा.शहादा ता.शहादा यांचा मृत्यू झाला.

तर विशाल शरद पवार व योगेश उर्फ अमृत नारायण सोनवणे रा.शहादा ता.शहादा हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विशाल शरद पवार रा.प्लॉट नं.1 शिरुड चौफुली, शांतीनगर शहादा ता.शहादा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्राला चालकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोना अंकुश गावित करीत आहेत.

Web Title: Trawler’s four-wheeler Accident Three killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here