Home क्राईम sexually abusing : शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

sexually abusing : शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

11 -year-old arrested in Kothrud for sexually abusing a minor in Pune

पुणे | Pune: पुण्यातील शिवाजी नगर परिसरात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन लैंगिक अत्याचार (sexually abusing) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपी वॉचमनला अटक (arrested) केली आहे. मंग्या (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित मुलगी शाळेत आल्यानंतर त्याने पीडित मुलीला बोलण्यात फसवत बाथरुमकडे नेले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिला बाथरुमच्या आत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत मुलीने सदर प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना याची माहिती देण्यात आली. शिक्षकांनी मुलीच्या पालकांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली.

Web Title: 11 -year-old arrested in Kothrud for sexually abusing a minor in Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here