Home अहमदनगर अंत्यविधीतून परतताना गर्दीत ट्रक घुसला; २ ठार

अंत्यविधीतून परतताना गर्दीत ट्रक घुसला; २ ठार

अंत्यविधी आटोपून निघालेल्या महिलांना पाठीमागून ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये (Accident) दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना.

truck drove into the crowd while returning from a funeral 2 killed

पंढरपूर: अंत्यविधी आटोपून निघालेल्या महिलांना पाठीमागून ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. तर पाचजण जखमी झाले आहे. ही घटना गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

अंत्यविधी उरकून घरी परत निघालेल्या शोकाकूल महिलांच्या जमावात करकंबकडून भरधाव वेगाने येणारा मालट्रक घुसला. यामुळे काही लोकांची धावपळ झाली. या अपघातात हिराबाई भारत गुटाळ (वय ४५, रा. पुनर्वसन टाकळी, ता. पंढरपूर) मुक्ताबाई गोरख गुटाळ (रा. कलगाव, ता. करमाळा) यांचा मृत्यू झाला.

Web Title: truck drove into the crowd while returning from a funeral 2 killed

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here