Home अहमदनगर अहमदनगर: एकुलता एक मुलगा नदीच्या पाण्यात बुडाला

अहमदनगर: एकुलता एक मुलगा नदीच्या पाण्यात बुडाला

Ahmednagar News:  गोदावरी नदीच्या पाण्यात २० वर्षीय मुलाचा बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना.

Ahmednagar only child drowned in the river

बोधेगाव: शेवगाव तालुक्यातील बोधेगाव एका २० वर्षीय मुलाचा राक्षसभुवन (ता. गेवराई, जि. बीड) येथे गोदावरी नदीच्या पाण्यात समीर सय्यद बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

समीर बाबाभाई सय्यद (वय २०) असे मृत मुलाचे नाव आहे. पती व मुलीच्या अकाली निधनामुळे डोळ्यातून वाहणारे अश्रू आटत नाहीत तोपर्यंत जगण्याचा आधार असलेला एकुलता एक मुलगाही हिरावल्याने मृताच्या आईचा हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा ठरत आहे.

समीर सय्यद हा भाच्याच्या लग्नासाठी गेवराई येथे मंगळवारी गेला होता. बुधवारी सकाळी नातेवाइकांसोबत गोदावरी नदीत आंघोळ करून तो परभणी जिल्ह्यातील मानवत याठिकाणी लग्नास गेला. तेथून तो पुन्हा बहिणीच्या घरी परतला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान तो बोधेगाव येथील मेहुणे अनिस ऊर्फ हब्बूभाई मुन्सी बागवान व इतर ५-६ नातेवाइकांसह शनिघाटापासून जवळच असलेल्या गोदावरी नदीत तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्यामुळे तो जागीच बुडाला. जरा वेळाने मेहुणे अनिस बागवान यांच्या समीर पाण्यात गायब झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा करत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. दहा-पंधरा मिनिटानंतर समीरला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला गेवराई येथील एका खासगी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले.

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाच्या सलीमा बाबाभाई सय्यद (वय ५२) यांच्या अंजूम (वय २२) या विवाहित मुलीचे तीन वर्षांपूर्वी प्रसूतीदरम्यान रुग्णालयातच निधन झाले. मुलीच्या निधनानंतर दहा दिवसांत पती बाबाभाई सय्यद (वय ५५) यांचेही यकृत निकामी झाल्यामुळे निधन झाले. मुलगी व पतीच्या निधनानंतर मोडून पडलेल्या संसाराचा गाडा एकुलत्या एक मुलाकडे बघत कसाबसा सुरू असतानाच तोही या दुर्दैवी घटनेत हिरावला गेल्यामुळे आईचे मातृत्वच आता कायमचे पोरके झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Ahmednagar only child drowned in the river

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here