अहमदनगर: ६ लाखाच्या बनावट नोटांसह दोघांना अटक
Breaking News | Ahmednagar: ६ लाख रुपयांच्या बनावट नोटांचे घबाड, दोघांना अटक (Arrested).
श्रीगोंदा: अवैध दारू तालुका व हत्यारांच्या मिळालेल्या टिपवरून बेलवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ लाख रुपयांच्या बनावट नोटांचे घबाड हाती लागले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री दुचाकीवरील दोघांना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली.
अजय मधुकर पुरके (३०, रा. पिंपळगाव भोसले, ता. आर्वी जि. वर्धा) व अनिल रघुनाथ देसाई (३३, रा. यराडवाडी, ता. पाटण, जि. सातारा) दोघेही हल्ली राहणार जयभवानी नगर, कोथरुड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना गोपनिय माहिती मिळाली, दौंड नगर रोडवरील कोळगाव-घारगाव रोडवर अवैध दारुची व बनावट हत्याराची चोरटी वाहतूक होणार आहे. त्यानुसार भंडारे यांनी पथक तयार केले. या पथकाने कोळगाव शिवारात हॉटेल विश्वरत्न येथे सापळा रचला. रात्री आठ वाजेच्या सुमारास एका मोटार सायकलवर दोन संशयित व्यक्ती दौंडच्या बाजूने येताना दिसले. त्यांना हात करून मोटारसायकल थांबविण्याचा इशारा केला असता. त्यांची गाडी घेऊन भरधाव वेगात निघून गेले. या मोटार सायकलचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर पकडले. त्यांच्याकडील कापडी पिशवीची तपासणी केली असता त्यात मोठी रक्कम दिसून आली. परंतु यामध्ये एकच नंबरच्या सर्व नोटा असल्याचे आढळले. अधिक चौकशी करता या नोटा बनावट असून या दोघांनी त्यांची छपाई केल्याची कबुली दिली. या पिशवीत ५००, २००, १०० किंमतीच्या ५ लाख ८० हजार रुपयांच्या या नोटा असल्याचे निष्पन्न झाले. यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस कर्मचारी मोहन गाजरे, रावसाहेब शिंदे, भाऊसाहेब यमगर, शोभा काळे, अविदा जाधव, सुरेखा वलवे, मपोना बंजगे, कैलास शिपनकर, विकास सोनवणे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई मोहन गाजरे करत आहेत.
Web Title: Two arrested with fake notes of 6 lakhs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study