Home अकोले अकोले: प्राथमिक शाळेत तीन विद्यार्थिनींना पूरक आहारातून विषबाधा

अकोले: प्राथमिक शाळेत तीन विद्यार्थिनींना पूरक आहारातून विषबाधा

Breaking News | Akole: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पूरक आहारातून तीन विद्यार्थिनींना विषबाधा.

Three students poisoned by food supplements in primary school

अकोले: तालुक्यातील वारंघुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पूरक आहारातून तीन विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून त्यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

आदिवासी भागात असणाऱ्या वारंघुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पूरक आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. अंडे व केळीच्या स्वरुपात पूरक आहार दिला होता. त्यातून वैशाली अनिल घाणे (वय १०), मेघना गोरख गभाले (वय १०) व पायल नवनाथ भागडे (वय १०) या चौथीच्या विद्यार्थिनींना काही वेळाने उलट्यांचा त्रास होऊ लागला. सदर बाब तेथील शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांना गावातील एका खासगी रुग्णालयात हलवले. तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सदर मुलींना पुढे हलवण्याची सूचना दिली असता उपाय म्हणून राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात  उपचार करण्यात आल्यानंतर आरोग्य विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर प्राथमिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेने ग्रामीण पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Three students poisoned by food supplements in primary school

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here