Home संगमनेर संगमनेर: अवैध खडी वाहतूक करणारे दोन डंपर आणि एक टेम्पो जप्त

संगमनेर: अवैध खडी वाहतूक करणारे दोन डंपर आणि एक टेम्पो जप्त

Sangamner News: अवैध खडी वाहतूक करणारे दोन डंपर आणि एक टेम्पो महसूल पथकाने जप्त (Seized) केल्याची कारवाई.

Two dumpers and one tempo transporting illegal gravel seized

संगमनेर: तालुक्यातील नांदूरखंदरमाळ परिसरामध्ये अवैध खडी वाहतूक करणारे दोन डंपर आणि एक टेम्पो महसूल पथकाने जप्त केला आहे. सदर वाहने ही घारगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे व तहसिलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, तलाठी युवराजसिंह जारवाल यांचे पथक नांदूरखंदरमाळ परिसरामध्ये अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज उत्खनन संदर्भात गस्त घालत असतांना त्यांना टेम्पो क्रमांक एम. एच. 17 बी वाय 7559, डंपर क्रमांक एम. एच 17 ए जे 5438, डंपर क्रमांक एम. एच. 17 बी. वाय 2788 ही वाहने मिळून आली.

सुनिल गंगाधर आहेर, (रा. गणोरे, ता. अकोले) आणि एन. के. गाडे (रा. संगमनेर) यांची ही वाहने असून त्यांच्याकडे खडीवाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधीत वाहने घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. सदर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नायब तहसिलदार उमाकांत कडनोर यांनी सांगितले.

Web Title: Two dumpers and one tempo transporting illegal gravel seized

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here