अहमदनगर जिल्हा विभाजन होणार? संगमनेर जिल्हा निर्मितीसाठी कृती समिती आक्रमक, मोठे जनआंदोलन उभारणार
Sangamner News: अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करावा या आपल्या न्याय मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली (massive mass movement ).
संगमनेर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करावा या आपल्या न्याय मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली असून आपल्या मागणीसाठी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांना निवेदन व मागील आंदोलनाचे स्मरण पत्र देण्यात येणार असून पुन्हा मोठे जनआंदोलन उभे करण्याचा पवित्रा संगमनेर जिल्हा कृती समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. संगमनेर जिल्हा व्हावा यासाठी पुढील आंदोलनाचे स्वरूप व रूपरेषा ठरविण्यासाठी काल शासकीय विश्राम गृहात सायंकाळी पाच वाजता बैठक पार पडली.
या बैठकीत सर्वांनमते मंगळवारी (20 जून) रोजी सकाळी ठीक 10 वाजता प्रांताधिकारी यांना प्रथम स्वरूपात संगमनेर जिल्हा मागणीचे निवेदन तथा स्मरणपत्र देण्याचे ठरले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सह उत्तर नगर जिल्ह्यातील इतर ही लोकप्रतिनिधी यांना अहमदनगरचे विभाजन करून संगमनेर जिल्हा व्हावा या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून सर्व निकषात बसणारा संगमनेर जिल्हा करावा व अकोल्याच्या दुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या सोयीसाठी सोयीस्कर असा संगमनेर जिल्हा करावा ही 35 वर्षांची जुनी मागणी आक्रमकपणे पुढे आली आहे.या बैठकीत 2018 साली संगमनेर जिल्हा मागणी साठी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. नागरिकांची संगमनेर जिल्हा पाठिंब्यासाठी स्वाक्षरी मोहीम व साखळी उपोषणाची आठवण काढत आता त्याही पेक्षा वेळप्रसंगी मोठे जनआंदोलन उभे करण्याची चर्चापर नियोजन झाले. यावेळी संगमनेरच्या अस्मितेसाठी संगमनेर जिल्हा मागणीसाठी पुन्हा एकदा मोठया संख्येने सर्व पक्षीय लोकांनी संगमनेर तसेच अकोल्याच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Action Committee will mount an aggressive, massive mass movement for the creation of Sangamner District
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App