Home अकोले अकोले ब्रेकिंग: मित्रांनीच गाडीवर बसवून नेत धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

अकोले ब्रेकिंग: मित्रांनीच गाडीवर बसवून नेत धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

Akole News:  धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोले शहरातील शाहू नगर परिसरात राहणाऱ्या एका कॉलेज तरुणाचा गर्दनी परिसरात डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या (Murder).

Akole youth was Murder by stabbing him with a sharp weapon while taking him 

अकोले: अकोले तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोले शहरातील शाहू नगर परिसरात राहणाऱ्या एका कॉलेज तरुणाचा गर्दानी परिसरात डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  

अशरफ अतिफ शेख वय १७ रा. शाहूनगर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. अशरफ हा काल दुपारी गायब झाला होता. त्याच्या नातवाईक यांनी शोधा शोध केली मात्र तो सापडला नाही. त्याचा मोबाईल देखील बंद सांगत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी अकोले पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यावेळी पोलिसांना तपासा दरम्यान त्याच्या काही मित्रांनी गाडीवर बसून नेले असल्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती मिळाले. त्या अनुषंगाने त्याच्या काही संशियीत मित्रांना देखील ताब्यात घेण्यात आले. मात्र संशियीत आरोपींकडून माहिती मिळत नव्हती मात्र मयत अशरफ शेख याच्या इंस्ताग्राम खात्यावर एक स्टोरी होती. या स्टोरीवर अशरफ याचा फोटो टाकण्यात आला होता. या फोटो पाठीमागे डोंगर दिसत असल्याने पोलिसांनी डोंगर परिसरात अशरफ याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी गर्दनी गावातून जाणाऱ्या मुथाळणे घाटात मृतदेह आढळून आला. अशरफ याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आला होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने अकोले शहरात खळबळ उडाली. शेकडो मुस्लीम बांधव मुथाळणे घाटात जमा झाले होते.

यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुषण हंडोरे, पोलीस नाईक, सुयोग भारती, आत्माराम पवार, महेश आहेर, यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. अशरफ याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समोर आले नसून तरी त्याचा मृत्यू लव जिहाद प्रकरणातून झाला असल्याचा त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. आरोपींना अगोदर अटक करावी असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. काही संशियीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे. त्याचा खून का करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Akole youth was Murder by stabbing him with a sharp weapon while taking him 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here