Home अहमदनगर थोरात-कोल्हे गटाने मारली बाजी, विखे गटाला धक्का- Ganesh Sugar Factory Election Result...

थोरात-कोल्हे गटाने मारली बाजी, विखे गटाला धक्का- Ganesh Sugar Factory Election Result Update

Ganesh Sugar Factory Election Result Update : निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी 9 वाजता राहाता तहसील कार्यालयात सुरुवात.

Ganesh Sugar Factory Election Result Update

राहाता: श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी 9 वाजता राहाता तहसील कार्यालयात सुरुवात झाली आहे. 8234 मतदारांपैकी 7335 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले. या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.

१९ जागासाठी शनिवारी मतदान झाले होते. यामध्ये १९ पैकी १८ जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करत आहेत. फक्त एका जागेवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखान्यातील सत्ता संपुष्टात आली आहे. हा विखे पाटील यांना धक्का आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकत्रित पॅनल असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या पॅनलचे उमेदवार सर्वच गटात पुढे होते. गणेश कारखाना सध्या विखे पाटील यांच्या प्रवरा कारखाना व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे.

1:55 pm, 19 Jun अपडेट (Ganesh Sugar Factory Election Result Update)

शिर्डी पाठोपाठ राहाता गटात ही थोरात कोल्हे गटाने बाजी मारली. या गटात थोरात कोल्हे गटाचे गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायणराव कार्ले हे विजयी झाले. त्यांना 3906 मते मिळाली. याच गटाचे संपत कचरू हिंगे हेही विजयी झाले. त्यांना 3688 मते मिळाली. गंगाधर पांडुरंग डांगे हे 3816 मते मिळवून विजयी झाले तर विखे गटाचे पुंजाजी दगडू गमे यांना 3273 मते मिळाली. उत्तम बळवंत डांगे यांना 3137 मते मिळाली. अनिल सोपान सदाफळ यांना 3247 मते मिळाली.

12:39 pm, 19 Jun अपडेट (Ganesh Sugar Factory Election Result Update)

शिर्डी गटाचा ट्रेंड पाचही गटात असाच राहिला तर गणेशमध्ये सत्तातर होणार आहे. विखे गटाचे एकमेव ब वर्गातील उमेदवार ज्ञानदेव बाजीराव चोळके विजयी झाले आहेत. काही वेळेत राहाता गट जाहीर होईल. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात- संजीवनी चे अध्यक्ष विवेक कोल्हे गटाने या निवडणुकीत बाजी मारली आहे. विखे पाटील गटाला 1 जागेवर समाधान मानावे लागेल.

12:17 pm, 19 Jun अपडेट (Ganesh Sugar Factory Election Result Update)

थोरात-कोल्हे गटाचे शिर्डी गटातील उमेदवार बाबासाहेब दादा डांगे ३८५९ व विजय भानुदास दंडवते ३ हजार ७८६ हे दोघे पहिल्या फेरीत ६५० ते ७०० मतांनी विजयी झाले आहेत. विखे पाटील गटाचे बाबासाहेब रामभाऊ डांगे यांना ३१५९ व बाबासाहेब परसराम मते यांना ३ हजार २७ मते मिळाली, दोघेही पराभूत झाले. शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शिंदे यांना भाऊसाहेब शिंदे यांना अवघी मते ४२ मिळाली.

10:06 am, 19 Jun अपडेट 

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीतील पहिला निकाल हाती आला आहे. ब वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके १५ मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी कोल्हे गटाचे सुधाकर जाधव यांचा पराभव केला. चोळके यांना ४४ मते पडले असून जाधव यांना २९ मते मिळाली. एकूण ७५ मतदान या मतदार संघात झाले होते. त्यापैकी दोन मते अवैध ठरली. ७३ मते वैद्य ठरली.

Web Title: Ganesh Sugar Factory Election Result Update

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here