Home गोंदिया नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

पांगोली नदीपात्रात बुडून (drowning) दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Two school children died after drowning in the river

गोंदिया : तालुक्यातील मुंडीपार (खुर्द) येथील पांगोली नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची  हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. २९) दुपारी दीडच्या सुमारास घडली. गंगाधर भिवाजी भरणे (वय १६) व आर्यन शैलेशकुमार शहारे (वय १६, दोघेही रा. मुंडीपार) अशी मयत मुलांची नावे आहेत.  नावे आहेत. मुलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

मोहरमनिमित्त शनिवारी शाळेला सुटी असल्यामुळे गंगाधर व आर्यन हे दोघेही सकाळी साडेदहाच्या सुमारास गावाजवळून वाहणाऱ्या पांगोली नदी शेतशिवारात आपापल्या घरातील शेळ्या चारण्याकरिता गेले होते. अशात नदीपात्राजवळून जात असताना आर्यनचा चिखलातून पाय घसरल्यामुळे तो नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा सोबती गंगाधरनेही प्रयत्न केले. मात्र, पाणी खोलवर असल्यामुळे तोही नदीपात्रात पडला. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. गंगाधर इयत्ता नववीचा तर आर्यन हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Two school children died after drowning in the river

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here