Home औरंगाबाद दीड वर्षांच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या

दीड वर्षांच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या

अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

A farmer couple committed suicide by hanging themselves in front of their child

छत्रपती संभाजीनगर: अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. आर्थिक विवंचनेतून या दाम्पत्याने हे जीवन संपविल्याची माहिती समोर येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतात कामासाठी गेलेल्या दाम्पत्याने एकाचवेळी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू दामोधर खंडागळे (वय 28) आणि अर्चना राजू खंडागळे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  राजू खंडागळे यांच्याकडे वडिलोपार्जित 2 एकर शेती आहे. त्यांच्यासोबत आई-वडील व दोन भाऊ आहेत. या सर्वांचा उदरनिर्वाह 2 एकर शेतीवर भागवणे कठीण असल्याने राजू यांनी गावातील एका शेतकऱ्याची शेती बटाईने करतात. मात्र, त्यातूनही फारसे उत्पन्न हाती येत नसल्याने आर्थिक तंगीमुळे राजू खंडागळे तणावात होते.

शुक्रवारी सायंकाळी राजू खंडागळे व त्यांच्या पत्नी अर्चना दोघेही पती-पत्नी शेतात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. विशेष म्हणजे सायंकाळी शेतात गेल्याने राजू यांना वडिलांनीही फोन लावून विचारणा केली होती. त्यावर शेतातून निघत असल्याचे राजू यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही बराच वेळ होऊन देखील हे दाम्पत्य घरी आले नाही. त्यामुळे वडिलांनी पुन्हा फोन लावला. तेव्हा ते फोन उचलत नसल्याने कुटुंबातील सदस्य शेतात गेले. यावेळी राजू आणि अर्चना दोघेही झाडाला गळफास घेतेलेल्या अवस्थेत आढळून आले.याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A farmer couple committed suicide by hanging themselves in front of their child

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here