Home Accident News अहमदनगर: बसचे ब्रेक फेल झाले अन, पुढे झाले असे काही…

अहमदनगर: बसचे ब्रेक फेल झाले अन, पुढे झाले असे काही…

Ahmednagar News: बसचे ब्रेक फेल झाले अन  वाळूच्या ढिगावर गाडी जाऊन पुढे असलेल्या बांधकामावर गाडीची धडक (Accident) बसून गाडी थांबली.

brakes of the bus failed and something happened next Accident

राहुरी: बसच्या अपघातांचे सत्र सुरुचाहे. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द  येथे पंढरपूरहुन जाणार्‍या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस एक बांधकाम चालू असलेल्या वाळूच्या ढिगावर घातल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.

कोल्हार खुर्द येथे नगर मनमाड महामार्गावर  पंढरपूरहुन नाशिकच्या दिशेने जात असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक (एमएच 40क्यू 6373) हि प्रवाशांना घेऊन जात असताना कोल्हार खुर्द जवळ या बसचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या (महादेव पांढरे, पंढरपूर डेपो) लक्षात आल्यानंतर त्याने बिरोबा मंदिराजवळ बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बस घातली. तेथे असलेल्या वाळूच्या ढिगावर गाडी जाऊन पुढे असलेल्या बांधकामावर गाडीची धडक बसून गाडी थांबली गेली.

रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. धडक बसल्यानंतर प्रवासी काहीवेळ घाबरले. यामध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही फक्त एक महिला किरकोळ जखमी झाली.

प्रवाशांचे दैव बलवत्तर व चालकाचे प्रसंगावधान यामुळे प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले कारण काही सेकंदावरच पुढे प्रवरा नदीचा पूल होता जर या चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर गाडी प्रवरानदीकडे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे चालकाच्या या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: brakes of the bus failed and something happened next Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here