अहमदनगर: धारदार शस्त्राने अनोळखी तरुणाचा खून, मृतदेह रस्त्यालगत फेकला
Ahmednagar News: एका अनोळखी तरुणाचा धारदार शस्र वापरून हत्या (Murder) करून रस्त्यालगत मृतदेह टाकून दिल्याची घटना.
राहाता: तालुक्यातील गोगलगाव शिवारात एका अनोळखी तरुणाचा धारदार शस्र वापरून हत्या करून रस्त्यालगत मृतदेह टाकून दिल्याची घटना घडली. दरम्यान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून मृत व्यक्तीची ओळख पटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
रविवारी लोणी पोलिसांना याबाबत खबर मिळताच ते घटनास्थळी पोहचले. लोणी-तळेगाव रस्त्यावर गोगलगाव शिवारात गोर्डे पेट्रोलपंपाच्या पुढे सोमनाथ भाऊसाहेब मगर यांच्या शेतजमिनीत तरवडाच्या झाडाजवळ हा मृतदेह आढळून आला. मयत व्यक्ती 45 ते 55 वयाचा असून त्याच्या अंगात चेक्सचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व पायात विटकरी रंगाची चप्पल होती. त्याच्या छातीवर धारदार हत्याराने मारून त्याचा खून केला. पोलिसांनी गुन्हा रजि.नंबर 445/23 भादवि कलम 302 प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास सपोनि युवराज आठरे हे करीत आहेत.
Web Title: unknown youth was Murder with a sharp weapon, the body was thrown by the road
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App