Home पुणे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Pune News: पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वडारवाडी येथील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide of a graduate student

पुणे : बी. एस्सी. (भौतिकशास्त्र) पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वडारवाडी येथील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ओम नीलेश कापडणे (वय २१, मूळ रा. नाशिक) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओम कापडणे हा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत होता. वडारवाडी येथील विष्णुकुंज इमारतीत भाड्याने खोली घेऊन मित्रासोबत राहत होता. गुरुवारी सायंकाळी खोलीत एकटा असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मित्र खोलीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पुणे शहरात गत पाच महिन्यांत चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title: Suicide of a graduate student

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here