Home महाराष्ट्र Rain Update: राज्यात पाऊस कुठं पडणार, हवामान विभागाकडून अपडेट

Rain Update: राज्यात पाऊस कुठं पडणार, हवामान विभागाकडून अपडेट

Weather Rain Update: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस (Rain) तर तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता.

Where will it rain in the state, update from Meteorological Department

Weather Update: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे.

कोठे होणार पाऊस आजची अपडेट:

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील अडीच ते तीन तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

आज कोठे झाला पाऊस:

सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज पहाटेच्या वेळी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ज्वारीसह रब्बी हंगामातील सर्व पीकांना फलदायी ठरणारा असा आहे. तर, द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी मात्र काहीसा नुकसानकारक ठरणारा आहे. सोलापूरात या पावसाची नोंद २८ मि.मी. इतकी झाली आहे.मध्यरात्रीच्या सुमारास सुरु झालेला पाऊस सकाळी उजाडेपर्यंत कमी-अधिक स्वरूपात सुरूच होता. काही भागात वीजेच्या कडकडासह पाऊस झाला तर काही भागात मध्यम व हलक्या स्वरुपात पाऊस झाला आहे. दक्षिण, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढासह अन्य तालुक्यातही हा पाऊस झाला आहे.

कोल्हापूरात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याची माहिती आहे. आदमापूर परिसरात सुद्धा जोरदार पाऊस झाला अचानक पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ झाली. तर मळणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात पाऊस झाला. तर, रायगड जिल्ह्यातील काही भागात देखील पावसानं हजेरी लावली. साताऱ्यात देखील दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला होता.

Web Title: Where will it rain in the state, update from Meteorological Department

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here