Home संगमनेर संगमनेर: वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, इंदोरीकर महाराजांना दिलासा

संगमनेर: वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, इंदोरीकर महाराजांना दिलासा

Indurikar Maharaj: आज इंदोरीकर महाराज सुनावणीला गैरहजर, आता पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.

Controversial statement case, relief to Indurikar Maharaj

संगमनेर: निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून देखील आज ते सुनावणीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून इंदोरीकर महाराजांना दिवाळी काळापुरता दिलासा मिळाला आहे. आता पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर होणार आहे.

अपत्य प्राप्तीबाबत इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर संगमनेर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र ते समन्स बजावून देखील आज सुनावणीला अनुपस्थित राहिले. दरम्यान इंदोरीकर महाराजांच्या वतीने वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीला आणि जामीन घेण्यासाठी इंदोरीकर महाराज न्यायालयात येणार का ? याकडे लक्ष लागले आहे. मूळ फिर्यादीच्या अर्जावरही २१ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

इंदोरीकर महाराज यांनी २०२० मध्ये शिर्डी येथील ओझरमध्ये एका किर्तनाच्या कार्यक्रमात अपत्य प्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संगमनेर सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची गुन्ह्यातून मुक्ता केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने हा खटला संगमनेर सत्र न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: Controversial statement case, relief to Indurikar Maharaj

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here