Home महाराष्ट्र सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका

Sex Racket: वाशी येथे एका हॉटेलवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे, तर मास्टरमाइंड तरुणीला अटक करण्यात आली असून चौघींची सुटका.

sex racket busted 17-year-old girl turns out to be the mastermind

नवी मुंबई: पोलिसांच्या मानवी तस्कर विरोधी पथकाने मंगळवारी वाशी परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी वाशी परिसरातील एका हॉटेलवर छापा (Raid) टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छापेमारीत पोलिसांनी देहव्यापारात अडकलेल्या चार तरुणींची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. तरुणीकडून सेक्स रॅकेट चालवलं जात होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एपीएमसी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने ‘मिड डे’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशी येथील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला आणि छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी जबरदस्तीने देहव्यापारात गुंतलेल्या चार तरुणींची सुटका केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता १७ वर्षीय तरुणी सेक्स रॅकेटची मुख्य सूत्रधार निघाली.

आरोपी तरुणी ही मुंबईतील मलाड परिसरातील रहिवाशी आहे. ती वेश्याव्यवसायातून मिळालेल्या पैशांपैकी काही पैसे पीडित तरुणींना द्याय ची आणि उर्वरित रक्कम स्वतःसाठी ठेवायची, असं एफआयआरमध्ये नमूद केलं आहे. सेक्स रॅकेटमधून सुटका झालेल्या सर्व तरुणींचं वय २० वर्षांच्या आसपास आहे. यातील एक तरुणी नेपाळ आणि इतर दोन तरुणी मूळच्या बिहारमधील रहिवाशी आहेत. संबंधित सर्वांना सुधागृहात पाठवलं. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहे.

Web Title: sex racket busted 17-year-old girl turns out to be the mastermind

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here