Home महाराष्ट्र Whether alert: दिवाळीत या जिल्ह्यांत पावसाचा होणार धमाका

Whether alert: दिवाळीत या जिल्ह्यांत पावसाचा होणार धमाका

Whether alert in Diwali season 

पुणे | Whether alert: दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर ते ४ तारखेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाउस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी 1 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत 3 ते 4 दिवस,  तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी 2 नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच नोव्हेंबर महिन्यातील 2, 3 आणि 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Whether alert in Diwali season 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here