Home Accident News Accident: टेम्पोच्या धडकेत मारुती ओमनी पलटी, बसलाही धडक

Accident: टेम्पोच्या धडकेत मारुती ओमनी पलटी, बसलाही धडक

Accident Between omani Car, Tempo and Bus

अस्तगाव | Accident | Rahata: अस्तगाव माथ्यावर शनिवारी पाच वाजेच्या सुमारास साईसिमरन हॉटेलपासून काही अंतरावर तिहेरी अपघात घडला. वेगाने जाणाऱ्या टेम्पोने मारुती ओमणीस जोराची धडक दिल्याने पलटी झाली तसेच बसलाही जोराची धडक दिली आहे.

याप्रकरणी ओमनी चालक सुनील कारभारी  सूर्यवंशी रा. गणेशपूर ता. चाळीसगाव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यात आयशर टेंम्पो क्रमांक आर. जे. 23 जीबी 9220 चा चालक सलमान अकबर खान (रा. मुंडरु ता. श्रीमाधवपूर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयशर टेंम्पो चालक सलमान अकबर खान याने नगरच्या दिशेने जात असताना याच दिशेने जात असलेल्या मारुती ओमनी हीस मागील बाजूने जोराची धडक दिल्याने धडकेत मारुती ओमनी गाडीने पलटी खावून चारही चाके वर झाली. या गाडीत चालकासह सात ऊस तोड मजुर होते. चालक जखमी झाला आहे. तसेच ओमनीला धडक मारताच हा आयशर टेंम्पोने डिव्हायडर च्या बाजुने जात असलेल्या शिर्डी औरंगाबाद या नेवासा डेपोच्या (एमएच 14 बीटी 3369) बसलाही क्लिनरच्या बाजुने धडक मारली. या अपघातात तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे. टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. आर. कदम करत आहेत.

Web Title: Accident Between omani Car, Tempo and Bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here