Home Suicide News Suicide: एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Suicide: एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Suicide of three members of the same family

मुंबई | Suicide: एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील वाशी येथे घडली आहे. आर्थिक नैराश्य आणि उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने आत्महत्य केल्याची माहिती मिळत आहे. वयोवृद्ध आई, मुलगा व मुलगी या तिघांनी आत्महत्या केली आहे.

वाशी सेक्टर ४ येथे माउली सोसायटीत मोहिनी कामवाणी वय ८७ अविवाहित मुलगा दिलीप वय ६७ आणि मुलगी कांता वय ६३ यांच्यासोबत राहत होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नसल्याने नैराश्यातून तिघांनी उंदीर मारण्याचे विष प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले. विष प्राशन करण्यापूर्वी तिघांनी पत्र लिहून ठेवली. यामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने नैराश्य आले आहे असे नमूद केले आहे.  

Web Title: Suicide of three members of the same family

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here