Home महाराष्ट्र Murder: पोलिस पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी

Murder: पोलिस पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी

Murder Case: गळा कापून खून, पत्नीने सुपारी देऊन घडवून आणल्याची धक्कादायक माहिती उघडकीस.

wife of the police who gave the tip of her husband's murder

सातारा: गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्या खुनाचे गूढ उलगडले आहे. हा खून पोलिस सांगितले. असलेल्या त्यांच्या पत्नीने सुपारी देऊन घडवून आणल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या खून प्रकरणात महिला पोलिस कर्मचारी शुभांगी अमित भोसले हिच्यासह सात जणांचा समावेश आहे.

अभिषेक विलास चतुर (२७, रा. नांदगिरी, जि. सातारा), शुभम हिंदुराव चतुर (२७, रा. कोरेगाव), राजू भीमराव पवार (२६, रा. १० पंताचा गोट, सातारा), सचिन रमेश चव्हाण (२२, रा. मुळशी, पुणे), सूरज ज्ञानेश्वर कदम (२७, खेड, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या पाचजणांमध्ये आणखी एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वाढे फाट्यावरील एका हॉटेलमध्ये २४ जानेवारीला रात्री पावणेबारा वाजता अमित भोसले हे त्यांच्या मैत्रिणीसोबत जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यातूनही ते बचावल्याने अखेर त्यांचा गळा कापून खून करण्यात आला होता. पोलिस दलात असलेल्या पत्नीने त्यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली. खून करणारी टोळी ही सराईत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: wife of the police who gave the tip of her husband’s murder

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here