Home संगमनेर संगमनेर: सह्याद्री अॅग्रोव्हेट कंपनीच्या गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान

संगमनेर: सह्याद्री अॅग्रोव्हेट कंपनीच्या गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान

Sangamner Fire: गोडावूनमधील कृषी क्षेत्राशी निगडित, दुग्ध व्यवसायातील मशिनरी  जळून खाक झाल्याची घटना.

Fire at Sahyadri Agrovet Company's godown, loss of lakhs

संगमनेर: सह्याद्री अॅग्रोव्हेट कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात घडली शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. गोडाऊनमधील सुमारे ६२ लाख रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा पंचनामा करण्यात आला.

वेल्हाळे गावच्या शिवारात या कंपनीचे मोठे गोडाऊन आहे. यामध्ये कृषी क्षेत्राशी निगडित तसेच दुग्ध व्यवसायसंदर्भात मशिनरी व आवश्यक उत्पादनांची निर्मिती सह्याद्री ॲग्रोव्हेट कंपनीत होते. कंपनीचे संचालक, उद्योजक नितीन हासे यांनी उद्योजक अमित पंडित यांच्या मालकीची जागा त्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. तेथे कंपनी निर्मित होत असलेला माल ठेवला जात असे.

शनिवारी सकाळी अचानक गोडाऊनला आग लागली. मोठ्या प्रमाणात रबर असल्याने आग वाढत गेली. इतरही यंत्रसामग्रीने पेट घेतल्याने आग आणखीनच वाढली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आग इतरत्र पसरू नये, यासाठी अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत सुमारे ६२ लाख रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. गोडाऊनमध्ये १२६ टन विविध प्रकारचे रबर, इलेक्ट्रिक वायर, मोटार, ऑटोक्लेव्ह असा सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल होता.

Web Title: Fire at Sahyadri Agrovet Company’s godown, loss of lakhs

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here