Home पुणे सत्यजित तांबे यांच्यावर नाना पटोले बरसले म्हणाले माझ्याकडे…

सत्यजित तांबे यांच्यावर नाना पटोले बरसले म्हणाले माझ्याकडे…

Satyajeet Tambe: सत्यजित तांबे यांच्या आरोपांनंतर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत इशारा दिला आहे.

Nana Patole reacted after Satyajeet Tambe's allegations

पुणे:  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Election) विजयी झाल्यानंतर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचा एबी फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता’,  असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय.

‘भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जो संदेश आम्हाला द्यायचा आहे, आम्हाला सर्वांना जोडून घ्यायचं आहे. पण जे कुणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात त्या लोकांचा आमच्याकडे सगळा मसाला आहे. मला आज त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही’, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना सुनावलं.

माझ्याकडे खूप मसाला वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार. हा परिवारातला वाद आहे. हा जास्त अंगावर आणला तर माझ्याकडे खूप मसाला आहे. मला त्या लेव्हला जाऊ देऊ नका’, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

Web Title: Nana Patole reacted after Satyajeet Tambe’s allegations

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here