Home अहमदनगर फ्लिपकार्ट कुरिअर बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार करून  लुटले

फ्लिपकार्ट कुरिअर बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार करून  लुटले

Ahmednagar News: पार्सल पोहोच करणाऱ्या कुरिअर बॉयवर हल्ला व वस्तू लुटल्या(robbed). 

courier boy was stabbed in the head with a coyote and robbed

श्रीरामपूर | Shrirampur: फ्लिपकार्ट पार्सल पोहोच करणाऱ्या कुरिअर बॉयवर हल्ला केल्याची घटना पुणतांबा येथील गणपती मंदिराजवळ घडली. कुरियर बॉयला खाली पाडून डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्याजवळील कुरिअर पार्सल, मोबाइल, रोख रोकड लुटली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी दि. ४ दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली.

श्रीरामपूर येथील कार्यालयातून फ्लिपकार्टने आलेले पार्सल पुणतांबा येथील ग्राहकांना पोहोचविण्याचे काम करणारा शुभम चोरडिया (वय २४) हा तरुण पुणतांबा येथील पार्सल वाटप करून उर्वरित पार्सल परत नेत असताना पुणतांबा- श्रीरामपूर रस्त्यावर पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ तरुणांपैकी एकाने शुभम चोरडिया यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत तसेच कोयत्याने डोक्यावर वार करून त्याच्याजवळील मोबाइल, रोख रोकड, कुरिअरची पार्सल बॅग सहित लंपास केली. जखमी झालेल्या तरुणाला पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: courier boy was stabbed in the head with a coyote and robbed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here