Home संगमनेर संगमनेरातील घटना: घराची सिमेंटची वरांडी पडल्याने चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

संगमनेरातील घटना: घराची सिमेंटची वरांडी पडल्याने चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

Sangamner News:  भिंतीवरील सिमेंटची वरांडी पडल्याने त्याखाली दबून चुलता व चिमुकली पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना. (Accident).

Sangamner Accident Two including a child, died after the cement balcony of the house fell

संगमनेर: संगमनेर तालूक्यातील वेल्हाळे (Velhale) गावातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. घराच्या भिंतीवरील सिमेंटची वरांडी पडल्याने त्याखाली दबून चुलता पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक महिला जखमी झाली आहे. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वेल्हाळे गावातील लक्षमण चंद्रभान सोनवणे वय ४५ आणि सारिका एकनाथ सोनवणे वय ५ या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात लक्ष्मण व एकनाथ सोनवणे हे दोघे भाऊ राहत आहेत. बाहेर पडवीत भाऊ आणि लहान मुलं जेवणासाठी बसले होते. रात्री अचानक त्या पडवीवरील सिमेंटची वरांडी घराच्या पडवीमध्ये जेवत असलेल्या लक्ष्मण सोनवणे व त्यांची पुतणी चिमुकली सारिका यांच्या डोक्यात जोरात पडल्याने मोठा आवाज झाला. त्यांच्याजवळच जेवत असणारे इतर जण थोडक्यात बचावले. या घटनेत मयत लक्ष्मणची सावत्र आई वैजंताबाई चंद्रभान सोनवणे यांच्या पायाला जबर मार लागला असून त्या जखमी झालेल्या आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची गावात पसरल्याने गावात शोक व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आणि जखमींना तात्काळ मेडिकेवर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच लक्ष्मण सोनवणे व सारिका सोनवणे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृतदेह कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात वेल्हाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Sangamner Accident Two including a child, died after the cement balcony of the house fell

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here