Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात लेडी गँगची दहशत, काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यात लेडी गँगची दहशत, काय आहे प्रकरण?

Ahmednagar news: अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी येथे दोन दिवसांत लेडी गँगची (Lady gang ) दहशत माजवली आहे. मुली सीसीटीव्हीत कैद.

Lady gang terror in Ahmednagar

श्रीगोंदा | Kashti: काष्टीत चोरांची दहशत नेहमीच अनुभवायला असते. काष्टीतील गुन्हेगारी कायमच चर्चेत राहिली आहे गावात असणारी मोठ्या बाजार व व्यापारी पेठेवर चोरांचे लक्ष असते. मात्र, दोन दिवसांत गावात मध्यरात्रीनंतर फिरणाऱ्या, चेहरे झाकलेल्या लेडी गँगने चांगलीच दहशत माजवली आहे.

सीसीटीव्हीत या मुली कैद झाल्या आहेत. या मुली नेमक्या कोण, एवढ्या बिनधास्त कशा फिरतात आणि त्यांची देहबोली धाडसी असल्याने गावात दहशत आहे. पोलिसांनी त्या मुली नेमक्या कोण आहेत याचा शोध सुरू केला आहे.

भुरट्या चोऱ्यांकडे दुर्लक्ष झाले तरी आता तेथे दिसलेली नवीन लेडी गँग सगळ्यांची झोप उडवीत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी काष्टीतील एका गल्लीतून पाच मुली बिनधास्तपणे जाताना दिसून आल्या आहेत. याबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे.

या मुलींचा पेहराव सामान्य असला तरी त्यांनी चेहरे झाकले होते. मात्र, त्यांची देहबोली खूपच बिनधास्त वाटत असल्याने काष्टीकरांची चर्चा सुरू झाली आहे. या मुली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. त्यात त्या कुठल्या तरी मोहिमेवर निघाल्याचे दिसत आहे. त्या रात्री गावातील काही लोकांनी पोलिसांना लगेच माहिती दिली. पोलिसांचे गस्तीपथकही गावात आले, मात्र त्या मुली तोपर्यंत गायब झाल्या होत्या.

या दहशतीत पोलिसांनी लक्ष घातले असून, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबत चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Lady gang terror in Ahmednagar

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here