Home Accident News अहमदनगर धक्कादायक घटना:  पवनचक्कीचे पाते पडून अपघातात दोघे ठार

अहमदनगर धक्कादायक घटना:  पवनचक्कीचे पाते पडून अपघातात दोघे ठार

windmill blade fell and killed both of them in the accident

Ahmednagar | अहमदनगर:  कंटेनरमधून वाहतूक केले जाणारे पवनचक्कीचे जीपवर पडल्याने  भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. देहेरे (ता. नगर) शिवारात आज रात्री दीड वाजता हा अपघात झाला.

या अपघातात सुशीला विलास रासकर, शाम बाळासाहेब रासकर (दोघे रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) असे मृत व्यक्तीचे नावे आहेत. विलास अविनाश रासकर, आनंद विलास रासकर व शिल्पा शाम रासकर (सर्व रा. खंडाळा) असे अपघातात (Accident) जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. मयत व जखमी हे बोलेरो जीपमधून देवदर्शनाला जात असताना अहमदनगर- मनमाड रोडवरील देहरे शिवारात त्यांच्या जीपवर पवनचक्कीचे पाते पडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: windmill blade fell and killed both of them in the accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here