Home अहमदनगर Rape Case: वाढदिवस साजरा करून तरुणीवर अत्याचार

Rape Case: वाढदिवस साजरा करून तरुणीवर अत्याचार

Rape on young women by celebrating birthdays

अहमदनगर | Ahmednagar Rape Case:  अहमदनगर शहराच्या उपनगरातून तरुणाने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तरुणीवर दोन वेळा अत्याचार (Sexual abuse) केल्याची घटना समोर आली आहे. तसेच अत्याचार केल्यानंतर तरुणीची बदनामी केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आहे. सुरज सुरेश नन्नवरे (रा. केतकी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या युवतीने फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरूवातीला फिर्यादी व सुरज नन्नवरे यांची मैत्री झाली.  22 फेब्रुवारी रोजी सुरजचा वाढदिवस असल्याने फिर्यादी व सुरज त्याच्या बोल्हेगाव येथील मित्राच्या घरी गेले होते. तेथे वाढदिवस साजरा  केला नंतर त्याने फिर्यादीला वरच्या मजल्यावर नेऊन बळजबरी करून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत तिला धमकी देऊन अत्याचार (Sexual abusing) केला.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा बंधन लॉनजवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये पीडितेला घेऊन जात पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या मैत्रीणीला मोबाईलवर मेसेज पाठवून दोघांच्या संबंधाची माहिती देत बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.

Web Title: Rape on young women by celebrating birthdays

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here