Home Accident News भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार तर 15 जखमी

भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार तर 15 जखमी

Malegaon Accident 4 killed, 15 injured in road mishap

मालेगाव | Malegaon Accident: चंदनापुरी येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथे परतणाऱ्या भाविकाचा टेम्पो दुचाकीस्वराला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटल्याने मायलेकासह चार जागीच ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे. हा भीषण अपघात (Accident) मालेगाव चाळीसगाव रोडवरील गिगाव फाट्यावर रविवारी सायंकाळी घडला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चाळीसगावहून मालेगांवच्या चंदनापुरीच्या खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी तसेच त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून गोंधळ करण्यासाठी येत असतात. हा कार्यक्रम आटोपून चंदनपुरीहून परतीस निघाले तेव्हा चाळीसगाव गाव रोडवरील गिगाव फाट्यावर हा अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात आबाजी जालम पाटील वय ६०, बन्सीलाल सदा पाटील वय ४३, लीलाबाई पोपट पाटील वय ६५ व कांतीलाल पोपट पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

टेम्पोला मागून धडक दिल्यानं तो पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना मालेगाव जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Malegaon Accident 4 killed, 15 injured in road mishap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here