Home महाराष्ट्र तलावात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

तलावात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Three youths drowned in lake

पुणे | Pune: दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ साठवण तलावात बुडून (Drowned) तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.  दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता या युवकांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला.  या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या मृत तरुणांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  तिघेजण पोहण्यासाठी दुचाकीवर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेले होते. बराच वेळ झाल्याने हे घरी आले नाही. यामुळे घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला असता फोन बंद लागत होता. मित्रांना फोन लावला तर रिंग वाजत होती मात्र तो उचलत नव्हता. यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख ,रफिक इकबाल सय्यद ,कलिम सलीम सय्यद या सर्व जणांनी त्यांचा शोध दौंड शहर परिसरात घेतला. दौंड शहरात मेगळवाडी, लिंगाळी येथील पिण्याचे पाणी पुरवठा करणारे दौंड नगरपालिकेच्या तळ्याजवळ जाऊन पाहिले असता तेथे गाडी मिळून आली. तलावाच्या नजीक जाऊन शोध घेतला असता तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे व बॅग असे साहित्य मिळून आले.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या  मदतीने तलावातील पाण्यात जावून शोध घेतला असता या तिघांचे मृतदेह मिळून आले.  

Web Title: Three youths drowned in lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here