Home महाराष्ट्र मोठी बातमी:  नवाब मलिकांच्या  न्यायालयीन कोठडीत वाढ

मोठी बातमी:  नवाब मलिकांच्या  न्यायालयीन कोठडीत वाढ

Increase in judicial custody of Nawab Malik

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढविण्यात आली आहे. त्यांना 21 मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीने पीएमएलए कोर्टात दिली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच नवाब मलिक यांची  रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे.

तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीला विरोध केला होता. ईडीच्या कारवाईला हायकोर्टात दिलेलं आव्हान प्रलंबित असल्याचा दावा वकिलांनी केला होता. परंतु रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि त्यासाठी PMLA कोर्टाने मंजुरी दिली.

Web Title: Increase in judicial custody of Nawab Malik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here