Home महाराष्ट्र धक्कादायक: दुचाकी अडवून पतीसमोरच महिलेवर आळीपाळीने बलात्कार

धक्कादायक: दुचाकी अडवून पतीसमोरच महिलेवर आळीपाळीने बलात्कार

Rape of a woman in front of her husband

बुलडाणा : महिला दिन दिवसांवर आला असताना महिलेच्या अत्याचाराच्या (Sexual abusing) घटनेत वाढ होत आहे. एका विवाहितेवर पतीसमोरच दोन नराधमांनी बळजबरीने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिलेंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, बुलडाणा येथील पती पत्नी 6 मार्च रोजी धाड येथे जात असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास चिखला परिसरात दोन अज्ञात आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवून पतीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत, या महिलेवर दोघांनी आळीपाळीने बलात्कार (Rape) केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने 7 मार्च रोजी दुपारी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली.

या फिर्यादीवरून अज्ञात दोन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना केली असून, अधिक तपास एपीआय सदानंद सोनकांबळे हे करत आहेत.

Web Title: Rape of a woman in front of her husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here