Home महाराष्ट्र OBC Reservation Bill Passed: ओबीसी आरक्षणाचं विधेयक मंजूर

OBC Reservation Bill Passed: ओबीसी आरक्षणाचं विधेयक मंजूर

OBC Reservation Bill passed

OBC Reservation:  आज सभागृहात ओबीसी आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. (OBC Reservation Bill passed) आता निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारने स्वतःकडे घेतले आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात ओबीसी आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

मध्य प्रदेश पॅटर्न वापरण्यात आला आहे,  राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे. निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारने स्वतःकडे घेतले आहे. त्यामुळे आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला (Election Commission) निवडणूक जाहीर करता येणार नाही.

प्रभाग रचना, निवडणुकीच्या तारखा ठरविण्याचे अधिकार आता राज्य राज्यसरकारने स्वतःकडे ठेवले आहे.  निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांसंदर्भात राज्य सरकारसोबत सल्लामसलत (विचारविनिमय) करूनच निर्णय घेईल, अशी सुधारणा या विधेयकात करण्यात आली आहे.

सुधारणा विधेयक आमदार सुनील प्रभू यांनी अधिवेशनात मांडलं. मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे इत्यादींसह ज्या महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत, त्या निवडणुका किमान चार-पाच महिन्यांपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

Web Title: OBC Reservation Bill passed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here