Home Accident News Accident: चार चाकी व दुचाकी वाहनाच्या अपघातात वायरमनचा मृत्यू

Accident: चार चाकी व दुचाकी वाहनाच्या अपघातात वायरमनचा मृत्यू

Wireman dies in four-wheeler and two-wheeler accident

पारनेर | Accident: नगर पुणे महामार्गावरून म्हसणे फाटा बाबुर्डी रस्त्यावर दुचाकी वा चार चाकीचा अपघात घडला. गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार वरील वायरमनचा जागीच मृत्यू झाला आहे.

वैभव रावसाहेब गायकवाड वय २९ रा. जातेगाव ता.पारनेर असे या अपघातात मयत झालेल्या वायरमनचे नाव आहे. पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, जातेगाव, घानेगाव, गटेवाडी या पाच गावांत वायरमनचे काम करत होते.

वैभव गायकवाड हे नगर पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथून पळवेतील नवीन एमआयडीसीतील सबस्टेशनकडे वीज दुरुस्तीच्या कामासाठी कामानिमित्त जात असताना समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

Web Title:  Wireman dies in four-wheeler and two-wheeler accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here