Home अहमदनगर Suicide तालुक्यात खळबळ: एसटीच्या मागील बाजूस चालकाची गळफास लावून आत्महत्या

Suicide तालुक्यात खळबळ: एसटीच्या मागील बाजूस चालकाची गळफास लावून आत्महत्या

Shevgaon Suicide by strangling the driver at the back of the ST

शेवगाव | Suicide: परिवहन मंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे, शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दिलीप हरिभाऊ काकडे या शेवगाव आगारातील चालकाने आत्महत्या केली आहे. ते शेवगाव आगारात चालक म्हणून कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच डेपो अधिकारी व कर्मचारी यांनी डेपोत धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. ही घटना पसरताच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. बस कर्मचारी वर्गाचे विविध प्रश्न ऐरणीवर असताना ही घटना घडली आहे.

Web Title: Shevgaon Suicide by strangling the driver at the back of the ST

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here