Home अहमदनगर अहमदनगर: विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

अहमदनगर: विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

Ahmednagar, Electric Shock: डिपीवर काम करीत असताना वायरमनचा तारांना स्पर्श होताच शॉक लागून मृत्यू  झाल्याची घटना.

Wireman dies of Electric Shock

राहता | Rahata:  रांजणगाव खुर्द येथील जीवन प्राधिकरण योजनेसाठी  नवीन डिपी व पोल टाकून तारा ओढण्याचे काम सुरू होते. यात ठेकेदाराने लाईट बंद करण्याची परवानगी एक ठिकाणची घेतली व काम मात्र दुसर्‍या डिपीवर सुरू केल्याने नवनाथ मारुती सुपेकर या कर्मचार्‍याचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून मृत्यू झाला.

राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या डीपीचे काम सुरू असताना लाईट बंद करण्याची परवानगी एकरुखे सबस्टेशनची होती. त्याचा विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला. मात्र ठेकेदाराने कामगारांना गावठाण डिपीवर काम करण्यास सांगितले. या डिपीचा विद्युत पुरवठा सुरू होता. ही गोष्ट कामगारांना माहीत नव्हती. ठेकेदाराच्या सांगण्यानुसार कामगार गावठाणच्या डिपीवर चढल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू असल्याचे लक्षात आले. नवनाथ मारुती सुपेकर (वय 30) हे या या डिपीवर चढले. त्यांचा तारांना स्पर्श होताच त्यांचा शॉक लागून मृत्यू  झाला. ही घटना काल सोमवारी दुपारी घडली.

त्याला राहाता ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. राहाता पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकणी पुढील तपास राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. कदम व बाबा सांगळे करीत आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Wireman dies of Electric Shock

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here