Home क्राईम संगमनेर तालुक्यात पुन्हा धाडसी चोरी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

संगमनेर तालुक्यात पुन्हा धाडसी चोरी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

Sangamner Theft:  संगमनेर तालुक्यात सुकेवाडी येथील दरोडाची घटना ताजी असताना पुन्हा धाडसी चोरीचे घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

theft again in Sangamner taluka, looted in two lakhs

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथील सोनबा बाळाजी जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. ही घटना सोमवार ता.१९ डिसेंबर रोजी भरदुपारी घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथे सोनबा जाधव हे राहात आहे सोमवारी दुपारी अज्ञात चोरट्याने जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाट उघडून कपाटामधील रोख रक्कम पाच हजार, दीड लाख रूपये किंमतीचे मनी मंगळसुत्र,पन्नास हजारांचे लहान मुलांचे कानातील बाळ्या,गळ्यातील पान, लहाण मुलांची अंगठी,पंचवीस हजारांचे चांदीचे कमरेचे छल्ले असा एकूण २ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्याने पोबारा केला आहे.

याप्रकरणी सोनबा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४३६/ २०२२ भादवी कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी बोटा परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारीही चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकरीही वैतागले आहेत. त्यातच आता दिवसा ढवळ्या चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: theft again in Sangamner taluka, looted in two lakhs

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here