Home नाशिक धक्कादायक: नवदाम्पत्याची राहत्या फ्लॅटमध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास

धक्कादायक: नवदाम्पत्याची राहत्या फ्लॅटमध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास

Suicide News: पाथर्डी फाटा येथे नवदाम्पत्याची राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या.

Suicide couple hanged themselves by tying a rope to the roof hook in their flat

नाशिक: सात जन्माच्या रेशीमगाठीच्या बंधनात काही महिन्यांपूर्वीच अडकलेल्या नवदाम्पत्याने नैराश्यातून राहत्या सदनिकेत सिलिंगच्या हुकाला दोरी बांधून डब्यांवर उभे राहत एकाचवेळी गळफास घेत सोबतच जीवनप्रवास संपविला. या घटनेने पाथर्डी फाटा परिसर हादरला.

पाथर्डी फाटा परिसरातील गोल्ड नावाच्या नयनतारा अपार्टमेंटच्या ई-१२ क्रमांकाच्या सदनिकेत गौरव जितेंद्र जगताप (२९) हा त्याची पत्नी नेहा (२३) हिच्यासोबत वास्तव्यास होता. तो एका कंपनीत नोकरी करत होता; मात्र, काही दिवसांपासून त्याने नोकरीही थांबविली होती. दोन वर्षांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता.

तेव्हापासून ते येथे वास्तव्यास होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या युवा दाम्पत्याने गळफास घेत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

मृत गौरवच्या मावशी चित्रा यांनी गौरवला फोन केला होता; मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे मावशीने त्यांचा भाऊ यश जगतापला फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर यश घरी गेला असता बराचवेळ दरवाजाची बेल वाजविली. दरवाजा ठोठावला. मात्र, आतमधून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. याबाबतची माहिती त्वरित इंदिरानगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडला असता दोघांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Suicide couple hanged themselves by tying a rope to the roof hook in their flat

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here