Home क्राईम प्रेमसंबंधाला नकार दिल्याने महिलेचा खून

प्रेमसंबंधाला नकार दिल्याने महिलेचा खून

Pune Crime: महिलेने प्रेमसंबंधास नकार दिल्याने गळा दाबून, तसेच मारहाण करून खून केल्याची घटना.

Woman killed for refusing love affair

पिंपरी: सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या महिलेने प्रेमसंबंधास नकार दिल्याने गळा दाबून, तसेच मारहाण करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. १३) रावेत येथील फेलिसिटी सोसायटीच्या क्लब हाउसमध्ये घडली असून, पोलिसांनी सोसायटी प्लंबरला अटक केली आहे. प्रतिमा प्रमोद यादव (वय ३२, रा. फेलिसिटी सोसायटी, रावेत; मूळ रा. बिलासपूर, छत्तीसगढ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद रामेश्वर यादव (वय ३४) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरिफ झुल्फिकार मल्लीक (वय २१, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद यादव यांचे कुटुंब रावेत येथील फेलिसिटी सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले आहेत. प्रमोद यादव आणि त्यांची पत्नी प्रतिमा हे दोघेही त्याच सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करत होते. तर, आरोपी त्या सोसायटीमध्ये प्लंबिंगचे काम करत होता. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रतिमा कामावर गेल्या. त्या सोसायटीच्या क्लब हाउसमध्ये काम करत असताना आरिफ याने त्यांच्याकडे मोबाइल नंबरची मागणी केली. तसेच, आपण प्रेमसंबंधात राहू, असे म्हटले. मात्र, प्रतिमा यांनी विरोध केला. तसेच, हा प्रकार आपल्या पतीला व पोलिसांना सांगणार असल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरिफने त्यांचा गळा आवळला. तसेच मारहाण केली. त्यानंतर प्रतिमा यांना भिंतीवर ढकलून दिले. यामध्ये प्रतिमा गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा

मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी करत पोलिसांनी आरोपी आरिफ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Woman killed for refusing love affair

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here